Advertisement

सरकार चालवताय की दाऊदची गँग?, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? अशा शब्दांत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार चालवताय की दाऊदची गँग?, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
SHARES

मुंबईच्या एका एसीपींनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा CBI नं केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यात फक्त आणि फक्त काय “द्यायचं” राज्य आहे का? तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रिया नोंदवताना आशिष शेलार यांनी म्हटलंय की, सरकार विरोधात लिहिलं म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला…, मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारलं... , आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदांना निलंबित केलं.

मा. राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले तर सरकारच्या पोटात कळ येते.., माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही. न्यायालयाचे आदेशही मानत नाहीत.

हेही वाचा- लोकल प्रवासासाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना टीसीने दंड ठोठावला

अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावलं.., राज्यात फक्त आणि फक्त काय"द्यायचं" राज्य आहे का? तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस दलातील बदल्या आणि भ्रष्टाचारावरील आरोपांसदर्भात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधा गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे. मात्र चौकशीमध्ये महाराष्ट्र सरकार सहकार्य करत नसल्याची तक्रार सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यासंदर्भात आता न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस देखील बजावली आहे.

तर, दुसरीकडे मुंबईच्या एका एसीपींनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा CBI नं केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा