Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

समुद्राचं पाणी गोडं करणारा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार आहे का?- आशिष शेलार

समुद्राचं पाणी गोडं करुन मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

समुद्राचं पाणी गोडं करणारा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार आहे का?- आशिष शेलार
SHARES

समुद्राचं पाणी गोडं करुन मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? या बाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून या प्रकल्पावर फेरविचार करण्याची विनंती भाजप (bjp) आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. 

आघाडी सरकार, मुंबई पालिका पुनरावलोकन करणार का? समुद्राचं रोज २०० दशलक्ष लिटर पाणी गोडं करण्यासाठी १६०० कोटींच्या प्रकल्पाची गरज आहे का? महागडा प्रकल्प न्याय्य आहे का? जर १६०० कोटींच्या ४० टक्के खर्चात सध्याची गळती थांबली तर रोज २०० दशलक्ष लिटरच्या दुप्पट पाणी वाचेल.

मुंबईचा दररोज पाणी पुरवठा ३८०० दशलक्ष लिटर असून मुंबईत गळतीमुळे रोज वाया जाणारं पाणी सुमारे ९०० दशलक्ष लिटर इतकं आहे. महापालिका (bmc) आणि आतंरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कमीतकमी १० टक्के म्हणजे ३८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती सहज थांबवता येते. 

हेही वाचा- मुंबईत महापालिका उभारणार समुद्राचं पाणी गोडं करणारा प्रकल्प!

आमच्या एच/वेस्ट प्रभागात, माझ्या प्रयत्नांनी पायलट प्रोजेक्ट करुन एका वर्षात गळतीने वाया जाणारं १०० कोटी लीटर पाणी वाचवलं. महापालिका २४ प्रभागात असा प्रयत्न करुन वाया जाणारं पाणी का वाचवत नाही? मग मुंबईकरांचे १६०० कोटी "समुद्रात" का टाकताय? कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न आशिष शेलार (ashish shelar) यांनी उपस्थित केले आहेत. 

मुंबईत मे आणे जून महिन्यात होणारी पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी इथं समुद्राचं २०० एमएलडी खारं पाणी गोडं करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभा करण्याचं मुंबई महापालिकेने ठरवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत मनोरी इथंं २५ ते ३० एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून २०० एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. निर्मिती खर्च ३ ते ४ पैसे प्रतिलिटर इतका खर्च येणार असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितलं. त्यावर प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

या प्रकल्पावरून आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. (bjp mla ashish shelar oppose salt water desalination project of bmc)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा