Advertisement

पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!

बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियमधून सवलत देण्याच्या विचारात असलेल्या महाराष्ट्र सरकारला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सूचनावजा इशारा दिला आहे.

पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!
SHARES

बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियमधून सवलत देण्याच्या विचारात असलेल्या महाराष्ट्र सरकारला भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी सूचनावजा इशारा दिला आहे. या सवलतीचा लाभ केवळ बिल्डरला न होता तो थेट घर घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना झाला पाहिजे, अन्यथा आम्ही जाब विचारत राहू, असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

याबाबत ट्विट करताना आशिष शेलार म्हणतात, विकासकांना प्रीमियममध्ये सूट देण्याची फाईल आज पुन्हा मंत्रीमंडळात येणार असं समजतंय...पण सगळं नीट "ठरलंय" ना? काँग्रेसचं मन वळलंय ना? नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही! आमचा सवाल एवढाच आहे, घरं घेणाऱ्या सामान्य मुंबईकरांना फायदा होणार का?

हेही वाचा- “ज्या हातांनी मनसैनिकांना मारलं, त्याच हातांनी..”, मनसेचा इशारा

प्रीमियमच्या सूटीची खैरात बिल्डरला वाटाल आणि घरं घेणाऱ्यांची स्टॅम्पड्युटी विकासक भरेल अशी फसवी अट टाकाल तर खबरदार! घरांच्या किंमती वाढवून स्टॅम्पड्युटी विकासक भरेल, असा “हातभट्टीचा” व्यवहार करुन सामान्य मुंबईकरांना फसवलत तर आम्ही त्याचा जाब विचारतच राहू! असा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे. 

दरम्यान, मुंबईत (mumbai) नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्येही घरांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. २०२० मध्ये विक्री झालेल्या सर्व घरांचे अंदाजे मूल्य सुमारे १ लाख कोटी रुपयांपर्यंत आहे. सन २०१९ मध्ये विक्री झालेल्या घरांच्या विक्रीचे मूल्य ९०,७६९ कोटी रु. एवढे होते. संपूर्ण मुंबईत २५ डिसेंबरपर्यंत नोंदविल्या गेलेल्या घरांची सरासरी जवळपास ५८५ इतकी आहे. तर, केवळ २७ ते ३० डिसेंबरपर्यंत घरांची नोंदणी दुपटीने वाढून १,११९ इतकी झाली. 

सन २०२० मध्ये घरांच्या नोंदणीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे ३,१०७ कोटी रु. महसूल जमा झाला. त्यातील १,३५० कोटी रु. म्हणजेच ४३ टक्के महसूल हा डिसेंबर २०२० मध्ये मिळाला आहे. तर, १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०२० या कालावधीत १,७५६ कोटी रु. जमा झाले आहेत.

(bjp mla ashish shelar slams maharashtra government decision to cut premium rate for builder)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा