Advertisement

ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावलीय- अतुल भातखळकर

ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याचं वक्तव्य भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावलीय- अतुल भातखळकर
SHARES

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याचं वक्तव्य भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी केलं आहे.

पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे कालपासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

परळीची रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील हेवन पार्क या इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य संपवलं. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायच्या वयात पूजाने जग सोडले. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्याच्या बचावासाठी राजसत्ता एकवटल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा- ठाकरे सरकार करणार सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी?

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणाला दहा दिवस उलटून गेले तरी साधा एफआयआर न नोंदवणारे राज्याचे गृहमंत्री सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्या देशहिताच्या ट्विटसाठी भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहेत.

फक्त ट्विटरवर टीका करणाऱ्या विरोधकांवर कारवाई करण्याची तुमची योग्यता. पक्षाच्या नेत्यावर कारवाई करून पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाहीच, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी करत ठाकरे सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाच्या ११ ऑडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील एका मंत्र्याचं नाव या प्रकरणात समोर आलं. भाजपकडून (bjp) राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला असून त्याचा राजीनामा घेण्याची मागणी देखील होत आहे. त्यातच ८ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने, भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.

(bjp mla atul bhatkhalkar criticized thackeray government on pooja chavan suicide case)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा