Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

लतादिदी हे आमचं दैवत, माझ्या वक्तव्याचा विपर्यास- अनिल देशमुख

शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येईल, अशा बातम्या पसरल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका करण्यात आली होती.

लतादिदी हे आमचं दैवत, माझ्या वक्तव्याचा विपर्यास- अनिल देशमुख
SHARES

शेतकरी आंदोलनासंदर्भात सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात येईल, त्यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही समावेश असेल, अशा बातम्या पसरल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका करण्यात आली होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी खुलासा केला आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, स्वर साम्राज्ञी लतादिदी हे आमचं दैवत. उभ्या देशाला जल्लोषाची संधी देणारा सचिन आमचा लाडका. यांच्या ट्वीटची चौकशी मी लावल्याची अफवा विरोधकांनी पसरवली. तीही मी कोरोनाग्रस्त असताना. चाराणे-आठाण्यात वाट्टेल त्या अफवा पसरवणाऱ्या # फेक फॅक्टरीवाल्यांनो काळजी करा कायदे कडक आहेत!

हेही वाचा- भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत- देवेंद्र फडणवीस

शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असं अनिल देशमुख म्हणाले.

शेतकरी आंदोलनात आंतरराष्ट्रीय पाॅप स्टार रिहानाने मतप्रदर्शन केल्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारख्या भारतरत्नांनी सरकारची बाजू घेतली होती. परंतु त्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून ट्रोलर्सच्या टीकेचा सामना करावा लागला. मात्र केंद्र सरकारने सेलिब्रिटींवर दबाव टाकून त्यांना सरकारच्या बाजूने ट्विट करायला लावलं, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. 

भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरं तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी लगावला.

(maharashtra home minister anil deshmukh reacts on celebrity tweet in farmers protest)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा