Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

नवाब मलिकांविरोधात भाजप आक्रमक, दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भय निर्माण केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवाब मलिकांविरोधात भाजप आक्रमक, दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल
SHARES

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भय निर्माण केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अतुल भातखळकर यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली की राज्यात रेमडेसिवीर विकू नये, यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. म्हणून कलम १५३ अ आणि साथरोग कायदा या अंतर्गत मी नवाब मलिक यांच्याविरोधात दिंडाेशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

हेही वाचा- आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा; भाजपचं नवाब मलिकांना खुलं आव्हान

पोलिसांनी तातडीने त्यांच्यावर तात्काळ नोंदवावा, अशी आमची मागणी आहे. मी अनिल देशमुख यांच्याविरोधात समता नगर पोलिसांत याचप्रकारे तक्रार केली होती. सद्यस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली नाही तरी आम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार हे नक्की, असंही अतुल भातखळकर म्हणाले.

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर परवाना जप्त केला जाईल, अशी धमकी केंद्र सरकारने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. एवढंच नाही, तर लोकांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची असणारी ही औषधं आम्हाला विकण्याची परवानगी त्यांना द्यावी, अन्यथा महाराष्ट्राच्या जमिनीवर असलेली ही औषधं एफडीएच्या माध्यमातून जप्त करून जनतेला वाटप करण्याचं काम केलं जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा इशारा देखील नवाब मलिक यांनी दिला होता.

त्यावर नवाब मलिकांनी केंद्रावर जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. नवाब मलिक यांच्याकडे याचे पुरावे असतील, तर त्यांनी आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी, असं खुलं आव्हान भाजपने दिलं आहे.

(bjp mla atul bhatkhalkar register a complaint against nawab malik in dindoshi police station )


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा