खडसेंनी विधानसभेत केली भाजपची गोची

  Vidhan Bhavan
  खडसेंनी विधानसभेत केली भाजपची गोची
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - बुधवारी एकनाथ खडसे यांनी विधानसभा चांगलीच गाजवली. एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारमधील दोन मंत्र्यांना फैलावर घेतले. एकनाथ खडसे यांच्या या भूमिकेमुळे विधानसभेमधील विरोधकांचीच जागा भरुन काढल्याची चर्चा सुरु होती. जळगावमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात खडसेंनी तोफ डागली. विदर्भातील शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जात आहे. तर जळगावच्या शेतकऱ्यांनी मागणी करुनही त्यांना वीजेचे कनेक्शन दिले गेले नाहीत. आता आपले सरकार आले आहे पण आश्वासन दिल्याप्रमाणे आता शब्द पाळला पाहिजे, अशी आठवणही एकनाथ खडसे यांनी करून दिली.

  एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही धारेवर धरले. एमआयडीसी जमीनीबाबत असलेल्या भूंसपदानाबाबत एकनाथ खडसेंनी नियमांची माहिती विचारली होती. याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिली. त्यावर एकनाथ खडसे असमाधानी होते. 

  "मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर संबंधित मंत्र्यांनी दिलेले नाही. संबधित प्रश्नांचे उत्तर सोडून बाकी सर्व माहिती मंत्री देत आहेत," असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले.  

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना आश्वासन दिले की, "त्यांनी जमीन संपादनाच्या कायद्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाबद्दल विधी विभागाकडून अभिप्राय घेऊन पटलावर माहिती ठेऊ."

  काँग्रेस-एनसीपीच्या 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभात्याग केला आहे. अशा परिस्थितीमध्येही सत्ताधाऱ्यांनी विधानसभा सुरूच ठेवली आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारची को़ंडी केली. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिकाच एकानाथ खडसे निभावत आहेत की काय? अशी चर्चा विधान भवनात रंगली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.