Advertisement

"राणीच्या बागेत १०६ कोटींचा घोटाळा", भाजप आमदाराचा आरोप

भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

"राणीच्या बागेत १०६ कोटींचा घोटाळा", भाजप आमदाराचा आरोप
SHARES

भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. राणी बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे.

मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. भाजपनं मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे १३६ कोटी रुपये वाचवले होते. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही आम्ही उघडकीस आणला. महापालिकेच्या रस्ते निविदांत संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे, असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. १०० कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले.

निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील असं पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना २० ऑक्टोबर रोजी पाठवलं होतं. विनोद मिश्रा यांनीही असंच पत्र महापालिका आयुक्तांना २१ ऑक्टोबर रोजी पाठवलं होतं.

२९ नोव्हेंबरला निविदा उघडण्यात आल्या. त्यावेळी आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी १०६ कोटी अधिक रकमेची निविदा सादर केली आहे. १८८ कोटींच्या बोलीसाठी २९४ कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगतिलं.

या संदर्भात आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.



हेही वाचा

पालिकेच्या वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा