Advertisement

मुख्यमंत्र्यांना गाडी चालवायचं माहीत असेल, पण सरकार चालवायचं नाही- राणे

मुख्यमंत्र्यांना गाडी चालवायची माहिती असेल; पण सरकार चालवण्याचा त्यांचा अभ्यास नाही. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी बुधवारी केली.

मुख्यमंत्र्यांना गाडी चालवायचं माहीत असेल, पण सरकार चालवायचं नाही- राणे
SHARES

मुख्यमंत्र्यांना गाडी चालवायची माहिती असेल; पण सरकार चालवण्याचा त्यांचा अभ्यास नाही. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी बुधवारी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याच ज्ञान, अभ्यास उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे नाही. ना त्यांना खड्डे माहीत, ना राज्याची तिजोरी माहीत. मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांवर अंकुश नाही. म्हणूनच तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने तोंड करून आहेत. तर शिवसेना कलेक्टरसारखे सगळीकडे कलेक्शन फिरत आहे. मुख्यमंत्र्यांना गाडी कशी चालवायची हे माहीत असेल, पण सरकार चालवण्याचा त्यांचा अभ्यास नाही. त्यामुळं सरकार पुढे जात नाही.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली आणि मुंबईत होणाऱ्या आंदोलनात तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याची चर्चा आहे, यावर विचारणा केली असता, हे निव्वळ राजकीय आंदोलन आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं कोणतंही काम हे सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही. 

हेही वाचा- मनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन ते तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, असा टोमणा देखील नारायण राणे यांनी लगावला.

औरंगाबादच्या नामांतरावरून देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायचं हे बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं. पण मुलगा मुख्यमंत्री असताना त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. बाळासाहेब वरुन पाहत असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील. साहेबांच्या आदेशापेक्षा लाचारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रीपद त्यांना मोठं वाटतं. औरंगाबादचं संभाजीनगर जाहीर करायचं सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत. आम्ही होतो ती शिवसेना (shiv sena) वेगळी आणि आत्ताची शिवसेना वेगळी आहे, असा प्रहार देखील नारायण राणेंनी केला.

(bjp mla narayan rane slams cm uddhav thackeray and shiv sena over farmers protest)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा