Advertisement

मनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या निवडणुकीत सहभागी होत गावपातळीवर कधी नव्हे, ते उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मनसैनिकांच्या कामगिरीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कौतुकाची थाप दिली आहे.

मनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
SHARES

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले आहेत. परंतु अद्यापही निकालांमध्ये सुस्पष्टता नसल्याने प्रत्येक पक्षाकडून सर्वाधिक जागा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) देखील या निवडणुकीत सहभागी होत गावपातळीवर कधी नव्हे, ते उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मनसैनिकांच्या कामगिरीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कौतुकाची थाप दिली आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झालं. या निवडणुकीत सुमारे ७९ टक्के मतदान झालं. तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्याचा दावा सध्या भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा चारही पक्षांकडून करण्यात येत आहे. परंतु जोपर्यंत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होत नाही, तोपर्यंत तरी कुठल्या पक्षाच्या ताब्यात राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत, हे स्पष्ट होणार नाही. 

हेही वाचा- घासून नाय, तर विरोधकांची ठासून! ‘या’ ग्रामपंचायतींमध्ये मनसेचा सरपंच!!

त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ जागांवर विजय मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे (raj thackeray) यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीत आपले उमदेवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणवेत, असे निर्देश राज ठाकरे यांनी तमाम मनसे पदाधिकाऱ्यांना दिले होते. या निर्देशांचं पालन करत मनसैनिकांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत हे यश मिळवलं आहे. 

(raj thackeray reaction on mns victory in maharashtra gram panchayat election 2021)

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच ठरली अव्वल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा