Advertisement

‘त्या’लाही केंद्राची सुरक्षा द्या, नितेश राणेंचं थेट अमित शहांना पत्र

दिशाच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकेल, अशा व्यक्तीला सुरक्षा देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून केली आहे.

‘त्या’लाही केंद्राची सुरक्षा द्या, नितेश राणेंचं थेट अमित शहांना पत्र
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाला एकमेकांशी जोडत दिशाच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकेल, अशा व्यक्तीला सुरक्षा देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून केली आहे. (bjp mla nitesh rane wrote a letter to union home minister amit shah on sushant singh rajput and disha salian suicide case)

अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणे यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीसंदर्भात पुन्हा एकदा अनेक दावे केले आहेत. त्यांनी पत्रात लिहिलंय की, सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन या दाेघांचाही मृत्यू संशयास्पद रितीने झाला आहे. दिशा ८ जून २०२० मध्ये तिच्या मालवणी, मालाड येथील इमारतीच्या कंपाऊंडमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. दिशासोबत रोहन राय नावाचा एक उदयोन्मुख अभिनेता लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होता. परंतु मुंबई पोलिसांनी त्याची साधी चौकशी देखील केली नाही. दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा हाेण्यात तो महत्त्वाचा ठरू शकला असता. 

हेही वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : बॉलिवूडच्या 'या" सेलेब्रिटींची होऊ शकते चौकशी

ज्यावेळी दिशाचा इमारतीतून पडून मृत्यू झाला, त्यावेळी तो त्याच घरात उपस्थित होता. असं असूनही तो २५ ते ३० मिनिटांना घटनास्थळी पोहोचल्याचं म्हटलं जातं. यातून संशय निर्माण होताे.

चौकशी टाळण्यासाठी रोहनने मुंबई सोडली की त्याला मुंबई सोडायला भाग पाडलं. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने तो मुंबईत येण्यासाठी घाबरत असावा. त्याच्यावर कुणीतरी दबाव टाकत आहे. 

त्यामुळे त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात यावी, जेणेकरून तो मुंबईत येत असेल, तर त्याला सुरक्षित वाटू शकेल. सीबीआय तपासात रोहनचा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण, दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध आहे, असा माझा विश्वास आहे, असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा