Advertisement

Video: माफी नाही फक्त दिलगिरी, राम कदम नमले

बुधवारी सायंकाळी राम कदम थोडे का होईना नमले असून त्यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण राज्यातील तमाम महिलांची मागणी ही दिलगिरीची नसून माफी मागण्याची आणि त्यांच्याविरोधात कारवाईची आहे.

Video: माफी नाही फक्त दिलगिरी, राम कदम नमले
SHARES

घाटकोपर इथल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणं भाजपाचे आमदार राम कदम यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. विरोधकांना तर आयतीच संधी चालून आल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उडवत राम कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नेटकऱ्यांनीही राम कदमांची सोशल मीडीयावरून जोरदार धुलाई केली आहे. या सर्व घडामोडींनंतर अखेर बुधवारी सायंकाळी राम कदम थोडे का होईना नमले असून त्यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण राज्यातील तमाम महिलांची मागणी ही दिलगिरीची नसून माफी मागण्याची आणि त्यांच्याविरोधात कारवाईची आहे. त्यामुळे अजूनही महिला संघटना, राजकीय पक्ष या मागणीवर ठाम आहेत.


बघा, काय म्हणाले राम कदम?


कदमांचं वक्तव्य काय?

दहीहंडीच्या दिवशी राम कदम यांनी मुलींनी विरोध केला तरी तिला पळवून आणून लग्नासाठी तुम्हाला मदत करू असं विधान केलं होतं. या विधानाचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला नि मग चोहोबाजूने त्यांच्याविरोधात टीकेचा झोड उठली. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्वांनीच राम कदमांना कोंडीत पकडलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर भाजपानं 'बेटी भगाओ' कार्यक्रम सुरू केला आहे का? असा सवाल केला. धाडस दाखवा नि राम कदमांविरोधात कारवाई करा, असं थेट आव्हानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.


निषेध सुरूच

राम कदमांच्या या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद मुंबईसह राज्यभर उमटत असून निषेध, मोर्चे सुरू आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपालाही बसत आहे. भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण भाजपान राम कदम यांच्याकडून खुलासा मागवला आहे. वक्तव्याची सीडीही मागवून घेतली आहे. त्यामुळं आता हे प्रकरण आपल्या अंगलट आल्याचं लक्षात आल्यानं कदम यांनी थोडं नमतं घेतलं आहे.


व्हिडिओतून दिलगिरी

त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपण केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत दिलिगिरी व्यक्त केली आहे. घाटकोपर इथल्या आपल्या दहीहंडीत मी काय बोललो, त्याचा अर्धवट व्हिडिओ दाखवला गेला, तो पसरवला गेला. पण त्याचं विवेचन न करता महाराष्ट्रातील तमाम मातृशक्ती, भगिनी यांचा सम्नाम माझ्यासाठी लाखमोलाचा आहे, सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे कोणताही खुलासा न करता मी अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.



हेही वाचा-

नेटकऱ्यांनी केली राम कदमांची धुलाई

कदम यांना अटक झालीच पाहिजे, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा