Advertisement

MPSC परीक्षा न झाल्यास वर्षा बंगल्यासमोर उपोषण

नव्या तारखेलाही एमपीएससीची परीक्षा न झाल्यास मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईतील वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

MPSC परीक्षा न झाल्यास वर्षा बंगल्यासमोर उपोषण
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहीर केलेल्या नव्या तारखेमुळे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र या तारखेलाही परीक्षा न झाल्यास मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या मुंबईतील वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपचे (bjp) आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी १४ मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस शिल्लक असताना ऐन वेळी पुढे ढकलण्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले होते. सरकारच्या निर्यणाविरोधात शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा देत आमदार गोपीचंद पडळकर देखील या आंदोलनात सामील झाले होते. त्यानंतर पोलिसांनी पडळकरांना ताब्यात घेतलं आणि पडळकरांसोबत २० ते २५ जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा- MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं, अजित पवारांची स्पष्टच कबुली

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, हे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अतिशय बेजबाबदार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काल तारीख जाहीर केली नाही, म्हणून आंदोलन सुरू ठेवण्यात आलं. पण पोलिसांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपलं, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. सोबतच मुख्यमंत्र्यांवर कोण दबाव टाकतंय? काल तारीख का जाहीर केली नाही? सरकारमधील इतर मंत्री त्यांच्यावर दबाव टाकत आहेत का? असे प्रश्न देखील उपस्थित केले.

परीक्षा पुढं ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी. जाहीर केलेल्या नवीन तारखेला म्हणजेच २१ मार्च रोजी परीक्षा झाली नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देखील यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिला. 

तर दुसरीकडे, एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळं एमपीएससी परीक्षेत राजकारण आणण्याची गरज नाही, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( ajit pawar) यांनी विरोधकांना ठणकावलं.

(bjp mlc gopichand padalkar warns hunger strike on mpsc exam issue)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा