Advertisement

MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं, अजित पवारांची स्पष्टच कबुली

एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळं एमपीएससी परीक्षेत राजकारण आणण्याची गरज नाही, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावलं.

MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं, अजित पवारांची स्पष्टच कबुली
SHARES

एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळं एमपीएससी परीक्षेत राजकारण आणण्याची गरज नाही, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावलं.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस आधी पुढं ढकलण्यात आल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. ही परीक्षा रविवार १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. विद्यार्थ्यांच्या या उद्रेकानंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. 

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी याप्रश्न लक्ष घालत परीक्षा पुढं ढकलण्यात येणार नसून परीक्षेची तारीख आठवड्याभरातच जाहीर करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. त्यानंतर आयोगाने परीक्षेसाठी २१ मार्च ही नवी तारीख जारी केली.

या सर्व गोंधळासंदर्भात प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, एमपीएससी ही एक स्वायत्त संस्था आहे. तरीही काही जणांनी या मुद्द्यावरून वातावरण राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. खरं तर या प्रश्नी राजकारण करण्याची गरज नाही. कारण आमचा देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. मात्र सरकार काहीतरी वेगळं करत असल्याचा भासवण्याचा प्रयत्न झाला. 

हेही वाचा- MPSC: विद्यार्थ्यांचं होतंय मानसिक खच्चीकरण- देवेंद्र फडणवीस

परीक्षेसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी आपण स्वत: यामध्ये लक्ष घातल्याचं सांगितलं. सोबतच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील अधिकाऱ्यांसोबत बोलणं झाल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्याचे प्रमुख बोलले आहेत. आम्ही प्रमुखांच्या हाताखाली काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याची अमलबजावणी करण्याचं काम सरकारकडून केलं जाईल आणि आमचा त्याला पाठिंबा राहील, असं अजित पवार (ajit pawar) म्हणाले.

परीक्षा पूर्वनियोजित होती तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली? असं विचारण्यात आल्यावर, मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, झालो की याचं उत्तर देईन… मी पहिल्यांदाच सांगितलं की एमपीएससीने हे सर्व करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला हवं होतं. एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं हे माझं वैयक्तिक मत आहे. झालं ती दुर्दैवी घटना म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ यायला नको होती,” असं अजित पवारांनी सांगितलं.

(maharashtra deputy cm ajit pawar reacts on MPSC exam)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा