Advertisement

MPSC: विद्यार्थ्यांचं होतंय मानसिक खच्चीकरण- देवेंद्र फडणवीस

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या या उद्रेकानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना यामुळेविद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होत असल्याचं सांगितलं.

MPSC: विद्यार्थ्यांचं होतंय मानसिक खच्चीकरण- देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस आधी पुढं ढकलण्यात आल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. ही परीक्षा रविवार १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. विद्यार्थ्यांच्या या उद्रेकानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना यामुळेविद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होत असल्याचं सांगितलं.

एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होतं आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा (coronavirus) धोका पुन्हा वाढल्याने ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ही परीक्षा दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- परीक्षा पुढं ढकलून काय साध्य होणार? काँग्रेस नेत्याने विचारला प्रश्न

परीक्षा पुढं ढकलण्यात आल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आली. एमपीएससीच्या परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून पोहोचले होते. मात्र, ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न विद्यार्थी विचारत या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यातील रस्त्यावर उतरले. 

एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचं संकट कितीही मोठं असलं तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढं ढकलून काय साध्य होणार आहे ? या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली.

(opposition leader devendra fadnavis reaction on mpsc students protest in pune)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा