Advertisement

परीक्षा पुढं ढकलून काय साध्य होणार? काँग्रेस नेत्याने विचारला प्रश्न

विद्यार्थ्यांच्या उद्रेकावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. परीक्षा पुढं ढकलून काय साध्य होणार? असा प्रश्न काँग्रेस नेत्याने विचारला आहे.

परीक्षा पुढं ढकलून काय साध्य होणार? काँग्रेस नेत्याने विचारला प्रश्न
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस आधी पुढं ढकलण्यात आल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. ही परीक्षा रविवार १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. विद्यार्थ्यांच्या या उद्रेकावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. परीक्षा पुढं ढकलून काय साध्य होणार? असा प्रश्न काँग्रेस नेत्याने विचारला आहे.

एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय एमपीएससी मंडळाने आज घेतला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण काहीही असलं, कोरोनाचं संकट हे मोठं संकट आहे, हे जरी मान्य केलं, तरी केवळ २ ते ३ दिवस आधी अशा पद्धतीने निर्णय घेणं चुकीचं आहे. अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या युवकांनी या परीक्षेची महिनोंमहिने तयारी केलेली आहे, त्यांना अचानक अडचणीत टाकल्यासारखं आहे. म्हणून राज्य शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे, अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

हेही वाचा- MPSC: परीक्षा पुढं ढकलल्याने विद्यार्थी प्रचंड नाराज, पुण्यात रास्तारोको

मुलं आज बेरोजगारीमुळे त्रस्त झालेली असताना, अनेक वर्ष, अनेक महिने आपल्या गावापासून, घरापासून दूर राहून एमपीएससी, यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेची ते चातकाप्रमाणे वाट बघत असतात. त्यांनी तयारी केल्यावर अचानकपणे या परीक्षा रद्द करणं हे कुठतरी चुकीचं आहे. त्यामुळे या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

तर, महाराष्ट्रातील लाखो मुलांच्या भविष्याशी संबंधित MPSC exams ह्या पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा आहे. राज्य सरकारने ह्यात तात्काळ हस्तक्षेप करावा आणि परीक्षा घ्याव्यात. फिजिकल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून परीक्षा घेणं शक्य आहे, असं काँग्रेस नेते राजीव सातव म्हणाले.

ही परीक्षा दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

(maharashtra yuvak congress president satyajeet tambe reaction on mpsc students protest in pune)

हेही वाचा- राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा