शिवसेनेला प्रत्युत्तर...

 Bandra East
शिवसेनेला प्रत्युत्तर...
शिवसेनेला प्रत्युत्तर...
See all
Bandra East , Mumbai  -  

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून भाजपा शिवसेनेची युती तुटली. गुरुवारी रात्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपावर तोंडसुख घेत शिवसेना मुंबईसह राज्यात निवडणुकीत एकटी लढणार असल्याचे घोषित केले. यावर भाजपानेही सोशल मीडियावर पोस्टर बाजी करत शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने 'हिंदुत्व ही आमची बांधिलकी, नाही फक्त तोंड-पाटीलकी' आणि 'हिंदुत्व म्हणजे आचार-विचारांचा मेळ, नाही फक्त पोरखेळ' असे संदेश देत पोस्टरबाजी सुरू केली आहे. मतदानाची वेळ जशी जवळ येईल तशी पोस्टारबाजी वाढेल हे नक्कीच.

Loading Comments