Advertisement

५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढ

मुंबई उत्तरचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती.

५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढ
SHARES

मुंबई उत्तरचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संपत्तीत ५ वर्षांमध्ये ६ कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीत ६५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी भरलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे १५.७८ कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.


संपत्तीत ६ कोटींची वाढ

एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार गोपाळ शेट्टी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये स्थावर, जंगम आणि बचतीचा समावेश आहे. २०१४ साली त्यांच्याकडे ९.५६ कोटींची संपत्ती होती. तर २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती १५.७८ कोटी रूपये झाली आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत गोपाळ शेट्टी यांनी ३५.९९ लाख रूपयांचा तर त्यांच्या पत्नीनं याच कालावधीसाठी २१.२४ लाखांचा आयकर भरला असल्याचंही त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केलं आहे.  अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी गोपाळ शेट्टी यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला होता.




हेही वाचा -

निवडणूक आयोगाविरोधात विधान केल्यामुळं प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा