Advertisement

जावेद अख्तर यांच्या मुंबईतल्या घराच्या बाहेरील सुरक्षा वाढवली

काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या दोघांची तुलना केली होती.

जावेद अख्तर यांच्या मुंबईतल्या घराच्या बाहेरील सुरक्षा वाढवली
SHARES

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपानं केली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अख्तर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याचं कळतं.

काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस भाजपा जावेद अख्तर यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करत आहे.

जुहूमधील इस्कॉन मंदिराजवळ असणाऱ्या अख्तर यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीय. या ठिकाणी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

उजव्या विचारसरणीच्या जगभरातील संघटनांचे विचार हे सारखेच असतात असं मत अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य अख्तर यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधान मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करीत नाहीत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असं आव्हानही भातखळकर म्हणाले.

भाजप खासदार मनोज कोटक यांनीही जावेद अख्तर यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. खासदार मनोज कोटक म्हणाले की हा १९७० चा भारत नाही, २०२१ चा नवीन भारत आहे जो शत्रूंना चोख प्रत्युत्तर देतो.



हेही वाचा

...नाहीतर पुन्हा लागेल लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

नायर रुग्णालयाचा शताब्दी सोहळा: गर्दीमुळे मुख्यमंत्री नाराज; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा