Advertisement

Narayan Rane: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मातोश्रीपुरताच- नारायण राणे

कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेलेच नाहीत. ते केवळ मातोश्री निवास्थानी बसून आहेत. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही, तो मुख्यमंत्री हवाच कशाला? असा प्रश्न भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला.

Narayan Rane: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मातोश्रीपुरताच- नारायण राणे
SHARES

कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात फिरकलेलेच नाहीत. ते केवळ मातोश्री या त्यांच्या निवास्थानी बसून आहेत. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू देखील शकत नाही, तो मुख्यमंत्री हवाच कशाला? असा प्रश्न भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.

या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. मुंबईत ५ हजारांपेक्षा जास्त, तर राज्यात ८ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. तरीही सरकार गंभीर नाही. रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नाहीत. मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत. प्रशासकीय अधिकारी आपापल्या मर्जीने निर्णय घेत आहेत. त्यांच्यावर कुठल्याही मंत्र्यांचा खासकरून मुख्यमंत्र्यांना ताबा राहिलेला नाही. कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलेलं आहे. अशा परिस्थितीत हे सरकार सत्तेत राहणं योग्य नाही. त्यामुळेच मी राज्यपालांना भेटून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली होती. 

हेही वाचा- डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय 

कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात फिरकलेलेच नाहीत. सगळा कारभार मातोश्री या निवासस्थानातून चालवला जात आहे. खरं तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो 'मातोश्री'पुरता आहे. असंच चालणार असेल तर सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलेलं नाव पुन्हा बदलून सचिवालय करावं लागेल. सामान्य माणसाची कुणालाही चिंता नाही, अधिकाऱ्यांच्या बदल्या परस्पर होत आहेत. कुणाचाही कुणाला ताळमेळ नाही. त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे की नाही, हेच समजत नाही, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला. 

पंढरपुरातील आषाढीची महापूजा महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची असते. पण या पुजेला मुख्यमंत्र्यांनी महत्त्व दिलं नाही. मुख्यमंत्री पंढरपुरात गेले तर मूर्तीला हार घातला नाही, साधा हातही लावला नाही, गंध लावला नाही आणि प्रसादही हातात घेतला नाही. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. पिंजऱ्यातच राहायचं होतं, तर मातोश्रीतच विठ्ठलाची पूजा करायची होती. पंढरपुरात कशाला गेलात?, असा सवालही नारायण राणे यांनी केला.  

हेही वाचा- ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, नारायण राणेंचा सरकारवर निशाणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा