Advertisement

शिवसेना गद्दारी करून सत्तेत गेलीय, नारायण राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरे पदासाठी हवं ते करणारे आहेत. ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे नसल्याने शिवसेना देखील हिंदुत्ववादी पक्ष उरलेला नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला.

शिवसेना गद्दारी करून सत्तेत गेलीय, नारायण राणेंचा घणाघात
SHARES

शिवसेना पक्ष भाजपशी गद्दारी करून सत्तेत गेला आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) पदासाठी हवं ते करणारे आहेत. ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे नसल्याने शिवसेना देखील हिंदुत्ववादी पक्ष उरलेला नाही. त्यामुळे हिंदुत्व विचार आणि शिवसेना हे समीकरणच जुळणारं नाही, अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली.

(bjp mp narayan rane criticises shiv sena chief uddhav thackeray over hindutva)

पालघरमधील साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडं सोपवण्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी बुधवारी सकाळी 'जन आक्रोश यात्रा' काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या यात्रेला परवानगी नाकारत राम कदम यांना ताब्यात घेतलं आणि काही वेळाने सोडून दिलं. राम कदम यांच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी नारायण राणे यावेळी उपस्थित होते. या प्रकरानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. 

हेही वाचा- महाराष्ट्रात दिवाळीनंतर सरकारचेच फटाके वाजणार- नारायण राणे

यावेळी नारायण राणे म्हणाले की, आमचं हिंदुत्व सिद्ध करायला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असं शिवसेना (shiv sena) नेते म्हणतात. पण जे परीक्षेला बसत नाहीत आणि पासही होत नाहीत. त्यांना सर्टिफिकेट कोण देणार? भाजपाबरोबर गद्दारी करून, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हातमिळवणी करत त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला आहे. मग त्यांच्याकडून साधू-संतांचं रक्षण करण्याची काय अपेक्षा करणार?, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

पालघरमध्ये साधुंच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर योग्य कारवाई होत नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी हे आंदोलन केलं आहे. भारत हा साधू-संतांचा देश आहे, इथं त्यांच्यावर अत्याचार होता कामा नये. सध्याचं सत्तेत असलेलं महाराष्ट्रात सरकार या साधूंना न्याय मिळावा या मताचे नाहीत, असं म्हणत नारायण राणे यांनी राम कदम यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा