Advertisement

भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात

पालघर, गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी निवासस्थानापासून घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रेचं आयोजन करणारे भाजप (bjp) आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाजप नेते राम कदम पोलिसांच्या ताब्यात
SHARES

पालघर, गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी निवासस्थानापासून घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रेचं आयोजन करणारे भाजप (bjp) आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. “ सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याची,” प्रतिक्रिया यावेळी राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढण्याचं जाहीर केलं होतं. राम कदम यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यामुळे सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आला होता. 

हेही वाचा- पालघर हत्याकांडाचा तपास सीबीआयडे सोपवा, राम कदम यांची मागणी

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अशी कुठलीही यात्रा काढू नये, तसंच कायदा-सुव्यवस्थेत बाधा निर्माण करू नये असं आवाहन मुंबई पोलिसांकडून (mumbai police) राम कदम यांना करण्यात आलं. तरीही राम कदम आपल्या समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 

बुधवारी सकाळी खार येथील निवासस्थान ते पालघर येथील हत्याकांड स्थळापर्यंत काळी पट्टी लावून जन आक्रोश यात्रा काढण्यात येईल. २११ दिवस होऊन गेले, तर अजूनही न्याय मिळालेला नाही. ज्या ठिकाणी साधुंनी आपला जीव सोडला, त्याच ठिकाणी दिवे लावून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना आणि उपोषण करणार, महाविकास आघाडी सरकारने पालघर साधू हत्याकांडाचं प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करावं, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

(bjp mla ram kadam detained by mumbai police for palghar mob lynching agitation)

हेही वाचा- अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम यांची पदयात्रा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा