Advertisement

पालघर हत्याकांडाचा तपास सीबीआयडे सोपवा, राम कदम यांची मागणी

मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील साधू हत्याकांडाला (palghar mob lynching) ६ महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणीच्या तपासात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही.

पालघर हत्याकांडाचा तपास सीबीआयडे सोपवा, राम कदम यांची मागणी
SHARES

मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील साधू हत्याकांडाला (palghar mob lynching) ६ महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणीच्या तपासात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. यामुळे या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

राम कदम (bjp mla ram kadam) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात साधूंच्या अमानुष हत्येला ६ महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. तरीही या प्रकरणाच्या तपासात विशेष प्रगती झालेली नाही. यामुळे खरे गुन्हेगार बाहेर मोकाट फिरत आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदू साधूंची हत्या किंवा अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. यामुळे हे प्रकरण पुढच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (cbi)कडे सोपवण्यात यावं, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

हेही वाचा - ‘म्हणून’ पालघर हत्याकांडातील आरोपींना जामीन मिळाला

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले होते. पोलिसांनी या प्रकरणात एकूण १५४ आरोपींना अटक केली होती. यामध्ये ९ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवलेले होते. त्यातील पहिल्या गुन्ह्यातील २८ आरोपींचा समावेश दुसऱ्या गुन्ह्यांतही दाखवण्यात आला होता. तर तिसऱ्या आरोपपत्रातही त्यातील १८ जणांचा समावेश दाखवण्यात आला आहे. या आरोपींविरोधात पोलिसांना ९० दिवसात पुरावे सादर करणे गरजेचं होतं. मात्र पोलिस आरोपींविरोधात पुरावे दाखवण्यात अयशस्वी ठरल्याने डहाणू येथील स्थानिक न्यायालयाने या आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा