पालघर साधु हत्याकांड प्रकरणात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने हे प्रकरण पून्हा चर्चे आलं होतं

पालघर साधु हत्याकांड प्रकरणात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल
SHARES

पालघर येथील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या साधू हत्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)ने दोन दोषारोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५४ जणांना अटक केली आहे. त्यात ११ अल्पवयीन आरोपींचा ही समावेश आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचाः- नवी मुंबईत बुधवारी ३५६ नव्या रुग्णांची नोंद

पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने हे प्रकरण पून्हा चर्चे आलं होतं. या आरोपींना वाडा पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं आहे. आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने वाडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्यात आली. गडचिंचले गावातील २३ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. यापैकी ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आरोपांना करोनाची लागण झाल्याने वाडा शहरात सगळेच हादरले आहेत. या प्रकरणात आता सीआयडीने दोन वेगवेगळी आरोप पत्र दाखल केली आहे. त्यातील पहिल्या आरोपपत्रात १५४ आरोपींचे तर दुसरे ११ अल्पवयीन मुलांसंदर्भातले असल्याचे कळते.

हेही वाचाः- Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार- अशोक चव्हाण

काय आहे प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले हाेते. पोलिसांनी जंगलात जाऊन १५४ आरोपींना अटक केली होती. यामध्ये ११ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा