Advertisement

मंत्रीपद नव्हे, तर खासदारकीची आॅफर, दिल्लीवारीनंतर राणेंचा दावा

अमित शहा यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर राणे म्हणाले, ''मला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं. पण या समावेशाला विलंब का होत आहे? यामागचं कारण मुख्यमंत्र्यांनाच ठाऊक. परंतु मला शहा यांनी राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन दिलं आहे.

मंत्रीपद नव्हे, तर खासदारकीची आॅफर, दिल्लीवारीनंतर राणेंचा दावा
SHARES

राज्याच्या मंत्रीमंडळात जागा मिळेल, अशी आशा लागून राहिलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी हास्य दिसून आलं. निमित्त होतं दिल्लीवारीचं. या दिल्लीवारीत राणे यांना मंत्रीपदाऐवजी राज्यसभेवरील खासदारकीचं आश्वासन मिळाल्याचं राणे यांनी गुरूवारी सांगितलं. या आॅफरमुळे राणे गोंधळात पडले असून त्यांनी उत्तरासाठी २ दिवसांचा वेळ मागून घेतल्याचं म्हटलं जात आहे.

शिवसेनेचा विरोध आणि भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांची पक्षावरील नाराजी, यामुळे नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


कोण होते बैठकीत?

या दिल्लीवारीत राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. नितेश राणे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे. या भेटीत अमित शहा यांनी आपल्याला राज्यातील मंत्रीपदाऐवजी राज्यसभेवरील खासदारकीचं आश्वासन दिल्याचं राणे यांनी सांगितलं.


कुठे झाली बैठक?

अमित शहा यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर राणे म्हणाले, ''मला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं. पण या समावेशाला विलंब का होत आहे? यामागचं कारण मुख्यमंत्र्यांनाच ठाऊक. परंतु मला शहा यांनी राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन दिलं आहे.''


६ जागा रिक्त होणार

पुढील महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार असून महाराष्ट्रातून ६ जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा थंडावली असताना राणेंना दिल्ली दरबारी धाडण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे संकेत या भेटीमुळे मिळत आहेत.



हेही वाचा-

माझं भविष्य खरं ठरत नाही! राणेंची हतबलता

वाट किती पाहू? मुख्यमंत्र्यांच्या मागे राणेंचा फेरा...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा