Advertisement

वाट किती पाहू? मुख्यमंत्र्यांच्या मागे राणेंचा फेरा...

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राणे आणि मुख्यमंत्र्यांची राजभवन इथं तब्ब्ल १५ मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

वाट किती पाहू? मुख्यमंत्र्यांच्या मागे राणेंचा फेरा...
SHARES

सरकारला ना मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळतोय ना राणेंना सामावून घेण्याचा. त्यामुळंच की काय पण हताश नारायण राणे यांनी मुख्यमंत्री भेटीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी बुधवारी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राणे आणि मुख्यमंत्र्यांची राजभवन इथं तब्ब्ल १५ मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


कधी झाली भेट?

सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान पृथ्वी शॉ याचा सत्कार राजभवन येथे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याआधी मुख्यमंत्री आणि राणे यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे.


इशाऱ्यानंतरही प्रतिक्षा

काँग्रेसमधून राजीनामा देऊन काही महिन्यांपूर्वी बाहेर पडलेल्या राणेंनी आपल्याला फार प्रतीक्षा करायची सवय नाही, असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला होता. २०१७ मध्ये आपला शपथविधी होईलच, असं देखील जाहीर केलं होतं. मात्र २०१८ चा एक महिना उलटून गेला, तरी अद्याप त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही.


किती प्रतिक्षा करायची?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर सरकार अल्पमतात येईल, असं लक्षात आणून देत फडणवीस यांनी राणेंचा शपथविधी सध्या बाजूला ठेवल्याचे मानलं जात आहे. मात्र आता किती प्रतिक्षा करायची? असा प्रश्‍न राणे मुख्यमंत्र्यांना वारंवार विचारत असल्याचं कळत आहे.



हेही वाचा-

नारायण राणेंनी का घेतली मुख्यमंत्र्यांची भेट?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा