Advertisement

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सांगत जबाबदारी झटकायची- प्रविण दरेकर

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी जनतेला संबोधित करताना माहिती दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजप नेते प्रविण दरेकरांनी त्यांच्यावर टीका केली.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी सांगत जबाबदारी झटकायची- प्रविण दरेकर
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) वाढत असून याला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली लागू केली आहे. शिवाय, राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी रविवारी संध्याकाळी जनतेला संबोधित करताना माहिती दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही', अशी खोचक टीका भाजप (BJP) नेते प्रविण दरेकर यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नव्हतं. मुख्यमंत्री लसीकरणावर काहीही बोलले नाही. लसीकरणाच्या संदर्भात टाईम बाऊंड असे काहीही भाष्य केले नाही. कोरोनामुक्त (covid19) गाव, जिल्हा आणि राज्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. जर जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला. राज्यातील व्यापारी कामगार संकटात आहेत. त्यांच्याबाबत काही योग्य धोरण राबवित नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा करत नाही? कोकणातील चक्रीवादळात प्रभावित लोकांना अजून मदत मिळालेली नाही? तसंच मदत, रोजगार आणि उपचार याबाबत योग्य धोरण राबवले पाहिजे, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

राज्यातील (maharashtra) लसीकरणाची स्थिती काय, त्यावर ते काही बोलले नाही. तसेच त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावरही पण बोलण टाळले. एका ठिकाणी कोविड रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटवत आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन वाढवत आहात. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे बोलून जबाबदारी झटकायची. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीकाही दरेकरांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचं सांगत सावधगिरीने पुढं जावं लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.



हेही वाचा -

रविवारी नवीन कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांच्या खाली

मुंबईत अखेर पेट्रोलनं घाटली शंभरी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा