भाजपाचं शिवसेनेविरोधात नवं अस्त्र?

  Mumbai
  भाजपाचं शिवसेनेविरोधात नवं अस्त्र?
  मुंबई  -  

  मुंबई - शिवसेना-भाजपामधले आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचले आहे. भाजपाच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, शिवसेनेला चक्रव्यूहामध्ये अडकविण्यासाठी आता भाजपा असे मुद्दे काढणार आहेत, ज्यामुळे शिवसेनेला आरोप फेटाळणे अवघड होणार आहे.

  मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये वादग्रस्त प्रस्तावांची लीस्ट काढण्यात आली आहे, ज्याला भाजपाचा विरोध असतानाही स्थायी समितीच्या शिवसेनेच्या सदस्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या सदस्यांची साथ घेऊन वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे भाजपाच्या भडीमाराला आता नव्याने शिवसेनेला तोंड द्यावे लागेल. तसेच महापालिकेच्या घोटाळ्यातील चौकशीची माहितीही मोक्याच्या वेळी लीक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.