'पॅरोलवरील गुन्हेगार निवडणुकीच्या प्रचारात'

  Vidhan Bhavan
  'पॅरोलवरील गुन्हेगार निवडणुकीच्या प्रचारात'
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - पॅरोलवर बाहेर आलेले गुन्हेगार निवडणुकीच्या प्रचारात दिसत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला. गणेश पांडे प्रकरणात अहवाल मागवून स्वत: लक्ष घालणार, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं होतं. पण सहा महिने झाले तरी हे प्रकरण निकाली नाही. तसेच गणेश पांडे हा आशिष शेलार यांचा निकटवर्तीय असल्याने कारवाई होत नाहीये का ? असा सवाल गोऱ्हे यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय महिला आयोग आणि उच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणीही नीलम गोऱ्हे यांनी केली.

  या वेळी त्यांनी नारायण राणेंवरही टीका केली. नारायण राणेंनी अविश्वास ठरावाचे पिल्लू सोडले आहे. याबाबत शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आदित्य ठाकरेंनी देता की जाता नारा दिल्यानंतर राणेंना किमान एवढं करणं तरी अपेक्षित असल्याचं टोला त्यांनी लगावला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.