Advertisement

युतीच्या चर्चेची जबाबदारी मुनगंटीवारांवर?

केंद्रात तेलगू देसम पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजपानं शिवसेनेबाबत राज्यात सावध भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच युतीच्या चर्चेची तयारी भाजपाकडून दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तर शिवसेना मात्र युती नाही असं दाखवतानाच दुसरीकडे वेट अँण्ड वाॅचच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर येत आहे.

युतीच्या चर्चेची जबाबदारी मुनगंटीवारांवर?
SHARES

सतत विविध मुद्द्यांवर टीका करून, रस्त्यावर आंदोलने करून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी भाजपाकडून दाखवण्यात आली आहे. एवढंच नाही, तर युतीसाठी चर्चा करण्याची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


काही दिवसांपूर्वीच ''कुणी काहीही म्हणो आगामी निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्रितच लढणार'', असा दावा मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला होता. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी हे राजकीय वक्तव्य केलं होतं. त्यांचे शिवसेनेच्या नेत्यांसोबत असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेऊनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

त्यावर, पराभवाचं भूत भाजपाच्या मानगुटीवर बसल्यानेच मुनगंटीवार अशी भाषा करत आहेत. युतीचा निर्णय सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुखच घेतील, असं प्रतिउत्तर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिलं होतं.


भाजपा सकारात्मक

तर, दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील भाजपा शिवसेनेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. असं असताना काही महिन्यांपूर्वीच 'एकला चलो रे' चा नारा देणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत भाजपासोबत युती करणार नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजापाने सर्वात पहिलयांदा मैत्रीचा हात पुढं केल्याने त्याला प्रतिसाद देत शिवसेनाही हात पुढं करते का? हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.


कारण काय?

केंद्रात तेलगू देसम पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजपानं शिवसेनेबाबत राज्यात सावध भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच युतीच्या चर्चेची तयारी भाजपाकडून दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तर शिवसेना मात्र युती नाही असं दाखवतानाच दुसरीकडे वेट अँण्ड वाॅचच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानच्या निकालापर्यंत शिवसेना वेट अॅण्ड वाॅचच्या भूमिकेत राहणार असल्याचीही चर्चा आहे.


युतीसाठी प्रयत्नशील

राज्यातही केंद्राप्रमाणेच युती टिकवत निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या, असा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षाला सोडून निवडणुकांमध्ये उतरण्याची भाषा भाजपानं कधीच केली नसल्यानं युतीबाबत चर्चेसाठी भाजपा सकारात्मक असल्याचंही दानवे यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचं लक्ष आता युती होणार का की येत्या निवडणुकीत भाजपा विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार हे शिवसेनेच्या प्रतिसादावर अवलंबून असणार आहे.



हेही वाचा-

युती झाली, तर शिवसेनेशीच - मुनगंटीवार

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा