सत्ताधाऱ्यांनाच आचारसंहितेचा विसर?


  • सत्ताधाऱ्यांनाच आचारसंहितेचा विसर?
SHARE

मस्जिदबंदर - मुंबईमध्ये आचारसंहिता असताना देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आचार संहितेचा भंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. मस्जिदबंदर येथील एलटीमार्ग येथे भाजपातर्फे पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अमोल जाधव यांचे अभिनंदन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ताधारीच आपल्या सत्तेचा गैरवापर करत आचार संहितेचा भंग करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे देखील या मोठमोठ्या होर्डिंग्जवर का लक्ष जात नाही असा सवाल निर्माण झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या