'काँग्रेसने सत्तेत जे केलं नाही ते भाजपाने केलं'

 Sion
'काँग्रेसने सत्तेत जे केलं नाही ते भाजपाने केलं'
Sion, Mumbai  -  

शीव - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यापैकीच भाजपाची प्रचार सभा सोमवारी सायन कोळीवाडा येथे घेण्यात आली.

भाजपाची पारदर्शकता ही पालिकेने ओळखली असून ती लोकांना सुद्धा माहित आहे. तर, मग शिवसेना जर आम्हाला प्रश्न करत असेल की भाजपाने काय केलं? तर इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत असून त्यांनी जे केलं नाही ते भाजपाने करून दाखवलं असं आशिष शेलार या वेळी म्हणाले. रेल्वेचा विकास आणि त्यातील अमुलाग्र बदल तसंच नोटाबंदीचा निर्णय हे फक्त भाजपाचं घेऊ शकतो असं देखील आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

तर, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र त्यांची जर साथ द्याल तरच पुढे झाल नाहीतर मागे राहाल. नोटाबंदी, रेल्वे विकास, पारदर्शकता या सर्वांवर भाष्य करत भाजपाने आपली बाजू मांडली. तर, सायन कोळीवाडा विभागातील भाजपाचे सातही उमेदवार निवडून आले पाहिजेत जेणेकरून लोकांचा विकास करताना त्यांची नावे काढली जातील आणि ते कशातही कमी पडणार नाही असा दावा या प्रचार सभेत करण्यात आला. या प्रचार सभेत सायन कोळीवाडा विधानसभा आमदार कॅप्टन आर. तामिल सेल्वन, नगरसेविका राजश्री शिरवाडकर आणि सायन कोळीवाडा विभागाचे सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments