Advertisement

भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट


भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
SHARES

भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा कोणत्या विषयावर चर्चा झाली, या भेटीचं कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे .


ज्येष्ठ नेते अडगळीत

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपाचे अनेक जेष्ठ नेते अडगळीत पडले आहेत. त्यापैकीच एक मुरली मनोहर जोशी आहेत. भाजपचे जेष्ठ नेते अाणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदींविरोधात राष्ट्रीय मंच उभारला आहे. यात जोशी यांनी सहभाग घेतलेला नाही. मात्र जोशी यांनी अचानक ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे.


साथ की मनधरणी?

शिवसेना केंद्रात आणि राज्यातील सत्तेत भाजपासोबत सहभागी असली तरी पक्षाने नेहमीच मोदी सरकारविरोधात भूमिका मांडली आहे. त्यातच जोशी यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजपाच्या नाराज ज्येष्ठ नेत्यांचा शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा मिळणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला जोशी यांना भाजपानेच उद्धव यांची मनधरणी करण्यासाठी पाठवल्याचंही म्हटलं जात आहे.

भाजपाने मुंबईत आयोजीत केलेल्या वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेसाठी जोशी मुंबईत आल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र ठाकरे-जोशी भेटीबाबत भाजपा नेते बोलण्यास तयार नाहीत.हेही वाचा-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

मराठा मोर्चा पुन्हा उपसणार आंदोलनाचं हत्यारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा