Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं हृदय विकाऱ्याच्या झटक्याने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी येथील प्रायमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचं हृदय विकाऱ्याच्या झटक्याने निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी येथील प्रायमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गुरुदास कामत कामानिमित्त दिल्लीत गेले होते. मात्र बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने दिल्लीतल्या चाणक्यपूरी येथील प्रायमस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचं निधन झालं होतं.

गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. ते पेशाने वकील होते. त्यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी लॉची पदवी मिळवली. 


राजकीय प्रवास

काँग्रेसने त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमण या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र गेल्या वर्षी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे नाराज कामत यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. कामत लोकसभेवर दोनदा खासदार म्हणून निवडून गेले. ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी कुटुंबियांच्या जवळचे समजले जातात. राजकीय कारकिर्द

१९७२ मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर १९७६ मध्ये त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपदही भूषवलं. तर १९८४ मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. २००९ ते २०११ मध्ये यूपीए सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं. याचबरोबर त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. मात्र २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.


कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणारे काँग्रेस नेते कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध  जबाबदाऱ्या समर्थपणे  सांभाळल्या  होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री गुरूदास कामत यांच्या अकस्मात निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रुपात विचारधारेशी एकनिष्ठ आणि कणखर नेतृत्व हरपलं असून, ही काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

- राधाकृष्ण विखेपाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभाहेही वाचा -

गुरुदास कामत यांचे राजीनाम्याचे ‘स्मरणपत्र’Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा