भाजपाच्या जाहिरातींमध्ये मोदी झाले छोटे

 Mumbai
भाजपाच्या जाहिरातींमध्ये मोदी झाले छोटे
भाजपाच्या जाहिरातींमध्ये मोदी झाले छोटे
भाजपाच्या जाहिरातींमध्ये मोदी झाले छोटे
भाजपाच्या जाहिरातींमध्ये मोदी झाले छोटे
भाजपाच्या जाहिरातींमध्ये मोदी झाले छोटे
See all
Mumbai  -  

मुंबई - भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. मुंबईतील प्रत्येक होर्डिंग्जवर सध्या शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांचीच जाहिरातबाजी दिसत आहेत. मात्र भाजपाच्या जाहिरातबाजीमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीच्या जाहीरातींमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद मोदी हे असायचे. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत ठिकठिकाणी भाजपाने जाहिरातबाजी केली या जाहिरातबाजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो जाहिरातीमध्ये आहे, तर मोदींचा छोटा फोटो एका कोपऱ्यामध्ये लावण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा दाखवून पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेसाठी मते मागण्याची रणणीती भाजपाने तयार केली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातबाजीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा फोटो नाही.

Loading Comments