Advertisement

फेरीवाला प्रश्नावर मराठी-अमराठी भेद करु नये - उपाध्ये


फेरीवाला प्रश्नावर मराठी-अमराठी भेद करु नये - उपाध्ये
SHARES

फेरीवाला मुद्यावर त्यांना विचारले असता यामध्ये मराठी-अमराठी असा भेद असू नये. भाजपाने जानेवारी २०१७ मध्ये हॉकर्स पॉलिसी आणली. याला आता ११ महिने झाले. मात्र, पालिकेने सर्व्हे करायचे काम केले नसल्याने हॉकर्सचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या विशेष मुलाखतीत पालिकेवर आणि पर्यायाने शिवसेनेवर थेट हल्लाबोल केला.

महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर समाधानी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. तसेच या सरकारच्या विरोधात असंतोष माजवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, तरी देखील जनता भाजपाच्या बाजूने असल्याचे सांगत 2019 मध्ये देखील आमचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही उपाध्ये यांनी यावेळी व्यक्त केला.


पूर्ण मुलाखत पहाण्यासाठी खाली क्लिक करा:




आमचं नाणं खणखणीत 

सरकारमध्ये आमचेही मंत्री आहेत, त्यांचेही आहेत. कोणी कसे वागायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, आमचे नाणे खणखणीत आहे, असे सांगत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेने केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपाचा समाचार घेतला. नवी मुंबई विमातळाचा प्रश्न असो किंवा राज्यातील विविध रखडलेले प्रकल्प असो, हे सरकार ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा 

मुंबई भाजपा प्रवक्त्यांना 'बोलती बंद'चे आदेश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा