भाजपा-शिवसेनेत पुन्हा पोस्टर वॉर

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - भाजपा आणि शिवसेनेमध्ये पुन्हा पोस्टर वॉर रंगलंय. ‘काळ्या पैशाचा खात्मा, हेच अच्छे दिन’ अशा आशयाचं पोस्टर भाजपाकडून लावण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांचा हात आणि मोदींचा फोटो या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलाय. मात्र याला जशास तसं उत्तर दिलं नाही तर ती शिवसेना कसली. शिवसेनेनं भाजपाला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केविलवाणा आक्रोश, शेवटी शिवसेना प्रमुखांची आठवण झालीच’. अशा आशयाचे पोस्टर शिवसेनेकडून लावण्यात आलंय. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर भाजप-शिवसेना पोस्टर वॉर रंगणार हे मात्र नक्की.

Loading Comments