Advertisement

ओशिवरा स्टेशनवरून शिवसेना-भाजपचा श्रेयवाद


ओशिवरा स्टेशनवरून शिवसेना-भाजपचा श्रेयवाद
SHARES

ओशिवरा - उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकतीच ओशिवरा रेल्वे स्टेशनची पाहणी केली. डिसेंबर अखेरपर्यंत हे स्टेशन सुरू होणार आहे. गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान हे ओशिवरा स्टेशन होतंय. शिवसेनेच्या पुढाकारानं हे स्टेशन उभारण्यात येत असल्याचा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ऑक्टोबरमध्ये या स्टेशनचा दौरा केला तेव्हा केला होता. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी मात्र या स्टेशनचं काम सुरू होण्यासाठी महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे प्रयत्न असल्याचा दावा केलाय. ठाकूर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी या स्टेशनचा दौरा केला. या वेळी आशीष शेलारही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे या दोन मित्रपक्षांत पुन्हा एकदा श्रेयवादाचा सामना रंगल्याचं स्पष्ट झालंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा