भाजपाला हव्या किमान 95 जागा?

  Pali Hill
  भाजपाला हव्या किमान 95 जागा?
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती होण्याबाबत सकारात्मक पावलं टाकली जातायत. पण युतीसाठी भाजपाच्या नेत्यांकड़ून चक्क नांगी टाकली जात आहे. शिवसेनेशी युतीसाठी बोलणी सुरू झालीच, तर ९५ जागांवरही भाजपा समाधान मानण्याची शक्यता आहे. या जागा पदरात पाडून युतीचा मार्ग सुकर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाची युतीच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. त्यासाठी चर्चाही सुरू झाली आहे. पण युती व्हावी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाला 63 जागा दिल्या होत्या. यंदा भाजपाला 80 जागा सोडण्याची शिवसेनेची तयारी असल्याचं समजतं. पण घासाघीस करून हा आकडा 95पर्यंत वाढवण्याची शिवसेनेची तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येतेय. भाजपालाही हा आकडा समाधानकारक वाटत असल्यामुळे युती होणारच, अशी शक्यता भाजपच्या गोटातूनही व्यक्त होतेय.

  रिपाइंला 5 ते 7 जागा?
  गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं 135, भाजपानं 63 आणि रिपाइंनी 29 जागा लढ़वल्या होत्या. या वेळी भाजपाला 95 जागा सोडल्या तरी त्यांना रिपाइंला त्यातल्याच काही जागा सोडाव्या लागणार आहेत. रिपाइंला 5 ते 7 जागाच सोडल्या जाणार असल्याचंही समजतंय. रिपाइं गेल्या वेळेस युतीचा घटकपक्ष होता, पण सध्या आठवले भाजपासोबत आहेत. त्यामुळे भाजपालाच आता आपल्या वाट्याच्या जागा रिपाइंला द्याव्या लागणार आहेत.
  केवळ 11 जागांसाठी युती तुटली
  विधानसभा निवडणुकीत भाजपाने 130 जागांची मागणी केली होती. पण शिवसेना 119 जागांवर अडून बसली होती. भाजपाची 125पर्यंत तडजोड़ करण्याचीही तयारी होती. पण शिवसेना 119 जागांवरच अडून बसल्यानं युती फिसकटली. महापालिका निवडणुकीसाठी मात्र दोन्ही पक्षांचे नेते युतीसाठी आग्रही असल्याचं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.