Advertisement

विधान परिषदेच्या रिक्त जागेवर राणेंऐवजी माधव भांडारी?


विधान परिषदेच्या रिक्त जागेवर राणेंऐवजी माधव भांडारी?
SHARES

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. पण राणे स्वतः ही निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने आता भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


पराभवाच्या भीतीने राणे निवडणुकीत नाहीत?

या पोटनिवडणुकीत विजयासाठी १४५ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १२२ आमदार आहेत. सात अपक्ष, बहुजन विकास आघाडीचे तीन यासह अन्य छोट्या पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा लक्षात घेता १३५ आमदारांचे संख्याबळ आहे. राणे यांना काँग्रेसमधील दोन समर्थक आमदारांची मते मिळणार आहेत. त्यामुळे मतांचे गणित जुळण्याकरिता अजून ८ ते १० आमदारांची आवश्यकता आहे.

जर राणे निवडणुकीसाठी उभे राहिले तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन राणेंना पाडण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे पुन्हा पराभव होऊ नये, म्हणून राणे सावध भूमिका घेत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पुढील वर्षी जुलेैमध्ये भाजपा त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आणण्याच्या तयारीत आहे.


माधव भांडारीच का?

माधव भांडारी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यातच पक्षासाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. तसेच सरकार येऊन 3 वर्ष लोटली, तरी त्यांना हवी तशी संधी मिळाली नसल्याने स्वच्छ प्रतिमा असलेल्या भांडारींना निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच जो विरोध राणेंना शिवसेनेकडून होत आहे, तो माधव भंडारी यांना होणार नसल्याने ते सहज निवडून येऊ शकतात, अशी माहिती देखील 'मुंबई लाईव्ह'ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.



हेही वाचा

नारायण राणे चुकूनही मंत्री बनणार नाहीत- दीपक केसरकर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा