नारायण राणे चुकूनही मंत्री बनणार नाहीत- दीपक केसरकर


SHARE

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना लवकरच मंत्रिमंडळात सामविष्ट करून घेतलं जाणार असं म्हटलं जात असताना राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) आणि राणेंचे कट्टर विरोध दीपक केसरकर यांनी नारायण राणे हे चुकूनही मंत्री बनणार नाही, अशी प्रतिक्रिया 'मुंबई लाइव्ह'ला बोलताना दिली.


लढ्याला यश मिळो 

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोरडकर यांनी न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात जी याचिका दाखल केली, त्या याचिकेला नक्की यश मिळेल आणि आमचा सुंठी वाचून खोकला जाईल, अशी प्रतिक्रिया देखील केसरकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. 


'आधी स्वत:च्या मुलाला निवडूण आणा'  

ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा राणे करत आहेत, मग राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची मदत का मागता? असा प्रश्न केसरकर यांनी राणेंना विचारला आहे. राणे सध्यस्थित स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, तर जिल्ह्यात काय प्रभाव पाडणार, असा सवाल देखील केसरकर यांनी केला.

काही दिवसांतच मी मंत्रीपदाची शपथ घेईन, अशी प्रतिक्रिया नारायण राणे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे राणेंनी मंत्रीपद शपथीचे दिलेले संकेत खरे की दीपक केसरकर यांचे हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.हेही वाचा - 

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत


संबंधित विषय
ताज्या बातम्या