पालिकेत भाजपाची कामगिरी नंबर वन

 Pali Hill
पालिकेत भाजपाची कामगिरी नंबर वन
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना गेल्या पाच वर्षातील सर्व पक्षांची पालिकेत कामगिरी कशी होती हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण गेल्या पाच वर्षात नगरसेवकांने वा त्याच्या पक्षाने केलेल्या कामगिरी बघून मतदार मत देत असतो. तेव्हा गेल्या पाच वर्षाचा पालिकेतील सर्व पक्षांची कामगिरी पाहता भाजपा नंबर वन ठरली आहे. प्रजा फांउडेशनच्या सर्व्हेक्षणानुसार भाजपच्या नगरसेवकांची कामगिरी, त्यांनी खर्च केलेला निधी, त्यांची सभागृहातील उपस्थिती, त्यांनी विचारलेले प्रश्न, प्रश्नांचा दर्जा या अनेक निकषांवर भाजपाला प्रजाने 63.10 टक्के गुण दिले आहेत.

भाजपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला 60.86 टक्के गुण मिळाले आहे. तर सर्वाधिक नगरसेवक असताना, शिवसेनेचा महापौर असतानाही शिवसेना मात्र कामगिरीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून शिवसेनेला 60.51 टक्के गुण मिळाले आहेत. तर या खालोखाल काँग्रेसचा आणि त्यानंतर सपाचा नंबर लागतो आहे. सर्वात सुमार कामगिरी ही भारतीय शेतकरी कामगार पक्षाची आणि आरपीआयची राहिली आहे. मात्र या पक्षाचे केवळ प्रत्येकी एक नगरसेवक पालिकेत आहे. तर मनसेचे इंजिनही म्हणावे तसे पालिकेत धावलेले दिसत नाही. मनसेला 56.95 गुण मिळाले असून मनसे सहाव्या क्रमांकावर राहिले आहे. पालिकेतील पक्षांचे हे रिपोर्टकार्ड पाहता शिवसेनेवर भाजप भारी पडले असे म्हणावे लागेल.

Loading Comments