'भाजपकडून दाऊद गॅंगचा वापर'

  Vidhan Bhavan
  'भाजपकडून दाऊद गॅंगचा वापर'
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - सत्ताधारी भाजप आणि आशिष शेलार हे मुंबईत दाऊद टोळ्यांचा वापर करत आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

  मुंबईतील रियाज भाटी नामक व्यक्तीचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. त्याच रियाज भाटींनी भाजप आमदार आशिष शेलार यांना निवडणुकीत मदतही केली. त्याबदल्यात शेलार यांनी भाटी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील करुन घेतलं, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातआयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  भाटी राष्ट्रवादीत होते, त्याबद्दल माफी

  नवाब मलिक यांनी रियाज भाटी 4 महिने राष्ट्रवादीत होते हे मान्य करुन त्याबद्दल माफी देखील मागितली. मात्र रियाज भाटीला तुरुंगात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं यावेळी नवाब मलिक म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.