Advertisement

सत्ताधाऱ्यांनो..किती भांडाल ?


सत्ताधाऱ्यांनो..किती भांडाल ?
SHARES

वांद्रे – मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे गुरुवारी दिनानाथ नाट्यगृहात वितरण करण्यात आले. मात्र भाजपने या पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घातल्याने हा सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरला. महापौर स्नेहल आंबेकर यांनी नुकताच दहिसरच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत भाजपला प्रोटोकाल शिकवला होता. याची परतफेड भाजपने केल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महापालिकेकडून 50 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार अनिल देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, शिक्षण समिती अध्यक्ष हेमांगी वरळीकर आदी उपस्थित होते. भाजपकडून मात्र या कार्यक्रमाला एकाही नेत्याने उपस्थिती लावली नाही. भाजपच्या खासदार पूनम महाजन, आमदार पराग अळवणी, उपमहापौर अलका केरकर आदी भाजप नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेवरही होती. मात्र यापैकी कुणीही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

मनोज कोटक, भाजप गटनेता
मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉल शिकवणाऱ्या महापौर मात्र प्रोटोकॉल विसरले. खासदारांच्या नावाबरोबर उपमहापौरांचे नाव छापले. हे आक्षेप घेण्यासारखे असल्याने आम्ही आज बहिष्कार टाकला.

स्नेहल आंबेकर, महापौर
आम्ही प्रोटोकॉल पाळला नाही हे खरे नाही. प्रोटोकॉलप्रमाणेच सर्वांना निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र भाजपचे नेते का आले नाहीत हे आम्हाला माहीत नाही. इतके मात्र खरे की दहिसरचा कार्यक्रम अनधिकृतच होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा