Advertisement

भाजपाकडून सभांचा सपाटा; महिन्याभरात घेणार १ हजार सभा

आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो होणार आहेत.

भाजपाकडून सभांचा सपाटा; महिन्याभरात घेणार १ हजार सभा
SHARES

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुमारे १ हजार जाहीर सभा तसंच रोड शो होणार आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.


सोमवारी मोदींची पहिली सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा इथं सकाळी होणार असून अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा राज्यात होणार असल्याचं उपाध्ये म्हणाले.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्याशिवाय चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 


केंद्रीय मंत्रीही येणार

राज्यातील नेत्यांशिवाय राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्यात अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत असे केशव उपाध्ये म्हणाले.




हेही वाचा-

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात; गोपाळ शेट्टींविरोधात रंगणार सामना

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा भरणार अर्ज



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा