Advertisement

दादरमध्ये भाजपच्या माध्यम विभागाची कार्यशाळा


दादरमध्ये भाजपच्या माध्यम विभागाची कार्यशाळा
SHARES

'हमने कहा था, हमने किया है` या प्रमाणे मोदी सरकारने काम केलं आहे. त्यामुळे पक्षाला विविध राज्यांमध्ये यश मिळत आहे. हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती असल्याचं मत भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडलं. दादर पूर्व येथील वसंत स्मृती सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे महागाईवर नियंत्रण आणि जीएसटीमुळे एक देश, एक कर तसेच घोटाळे विरहीत सरकार यासाठी ई-गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमावर भर दिला जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

तसेच जीपीआरएस प्रणालीद्वारे कामाचा हिशोब ठेवला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतीपुरक कामावर भर, केंद्रीय करात राज्याचा हिस्सा 32 टक्क्यावरून 42 टक्के झाला. निती आयोगात मुख्यमंत्र्यांचा सहभाग, काश्मिरमध्ये सुशासन आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. तसेच युवकांच्या रोजगार वृद्धीत वाढ, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून रोजगार, पीक विम्याचं सुरक्षा कवच एसी/ एसटी आणि ओबीसी कल्याण योजना कार्यरत, अल्पसंख्याक समाजाला मदरसा शिक्षणाचं अत्याधुनिकीकरण, महिला सशक्तीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, दिव्यांगांना अधिकार, कृत्रिम अवयव दानाच्या कामावर भर इत्यादी कामे मोदी सरकारने तीन वर्षांत केल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटक सरकारच्या 'जय महाराष्ट्र'वर बंदी घालण्याच्या निर्णयावर संसंदेत भाजपा भूमिका मांडणार असल्याचेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

तर तुरीचे दर पडले हे चुकीचं विधान आहे. 5 लाख मेट्रीक टन तूर खरेदी केली. ही तूरडाळ मागच्या वर्षापेक्षा जास्त हमीभावाने खरेदी केलीय असा विश्वास भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा