Advertisement

प्रचारासाठी युवकांना साद?


प्रचारासाठी युवकांना साद?
SHARES

मुंबई - कांदिवलीतील हनुमान नगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. कुठे महिला वर्गाची मतं मिळवण्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवला जातोय, तर कुठे विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातंय. हनुमान नगरच्या वॉर्ड क्रमांक 28 मध्ये भाजपाच्या वतीने रविवारी 'युथ हेल्पिंग हॅंड' या संस्थेसोबत डान्स स्पर्धेचं आयोजन केलं गेलं.

या कार्यक्रमात भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकरांसह भाजपाचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आजची तरुण पिढीच आपली खरी ताकद आहे. त्यामुळे अशा तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे असं मत या वेळी खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं. 'युथ हेल्पिंग हॅंड' ही संस्था गेली अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेत तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं संस्थेचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा