Advertisement

विरोधकांचा मोगली झालाय - मुख्यमंत्री


विरोधकांचा मोगली झालाय - मुख्यमंत्री
SHARES

नागपूर - सोमवारी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. विरोधकांनी परिपक्वता दाखवावी, नगरपालिकेमध्ये भाजपाचे फूल फूलले आहे त्यामुळे विरोधी पक्षांचं मोगली झालं आहे. विरोधी पक्ष डोरेमॉनसारख्या कार्टुनमध्ये अडकला असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. मराठा मोर्चा, आरक्षण याबाबतीत अधिवेशनात गंभीरपणे रोडमॅप बनवला जाईल, अशी अपेक्षा करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मराठा मोर्चाचे निवेदन घेणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “मंत्र्यांनी निवेदन घेऊ नये, ही भूमिका मराठा मोर्चाने बदलली तर निवदेन घेण्याबाबत विचार करु.” शिवाय, दलित, ओबीसी समाजात कोणतीही चिंता राहू नये, याची काळजी सभागृह घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोटाबंदीनंतरही बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत सुरु आहेत, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “85 टक्के चलन बदलणार असल्याने त्रास होणारच. मात्र, सर्वसामान्य जनतेचे आभार, कारण नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा असल्याने त्रास सहन केला.” यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नोटाबंदीवरील भूमिकेवरही वक्तव्य केलं. “शिवसेनेचा नोटाबंदीला विरोध नाही, उद्भवलेल्या त्रासाला आहे.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच देशात नविन व्यवस्था सुरु करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. जिल्हा सहकारी बॅकांना जुन्या नोटा स्वीकारता याव्यात यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मात्र निर्णय झाल्यानंतर दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात या बॅकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैश्याचा फ्लो आला होता, त्यामुळे आरबीआयला संशय आला होता त्यामुळे बंदी घातली होती, मात्र आता निर्बंध शिथील करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा