Advertisement

“२५ वर्षे सत्तेत, मुंबईकरांच्या वाट्याला बोलाची कढी व बोलाचाच भात”

शिवसेनेने मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत भाजपने सत्ताधारी शिवसेनेविरोधात महापालिका मुख्यलयासमोर मूक निदर्शने केली.

“२५ वर्षे सत्तेत, मुंबईकरांच्या वाट्याला बोलाची कढी व बोलाचाच भात”
SHARES

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपच्या आरोपांना आता आणखीच धार चढू लागली आहे. शिवसेनेने (shiv sena) मुंबईकरांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत भाजपने सत्ताधारी शिवसेनेविरोधात महापालिका मुख्यलयासमोर मूक निदर्शने केली.

शिवसेना मुंबई महापालिकेत १९९६ ते २०२१ अशी सलग २५ वर्षांपासून महापौरपदी विराजमान आहे. सत्ताधारी शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत मुंबईकरांसाठी अनेक वचणं दिली. मात्र, प्रत्यक्षात ती वचण पूर्ण केली नाहीत, असा दावा भाजप (bmc) नगरसेवकांनी यावेळी केला.

महापालिकेतील (bmc) सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांमध्ये ‘जे बोलतो ते करतो’ असे छातीठोकपणे सांगितलं होतं. मात्र, तब्बल २५ वर्ष उलटूनही मुंबईकरांच्या हाल-अपेष्टा संपलेल्या नाहीत. याउलट धनदांडग्याना करामध्ये सवलती देत महापालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर १६ वर्षांत २० हजार १४५ कोटी रुपये खर्च करूनही दरवर्षी मुंबईची तुंबई होते, हा सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा उत्तम नमुना असल्याचं म्हणत महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेवर टीका केली.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भाजपचा प्रतिसाद, जेलभरो आंदोलन केलं स्थगित

मुंबईकरांना (mumbai) ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, ७०० चौरस फुटापर्यंत मालमत्ता करात सवलत, खड्डे विरहीत रस्ते, तुंबई मुक्त मुंबई, २४ × ७ तास पिण्याचं पाणी, दर्जेदार रुग्णालये, बेस्ट उपक्रमाचे विलिनीकरण, डबेवाला भवन, मराठी शाळा दर्जोन्नती, मराठी भाषा विभाग अशा अनेक आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. सर्वसामान्य मुंबईकराच्या भावनेशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मुंबईकर जनताच धडा शिकवेल, असंही प्रभाकर शिंदे म्हणाले.

तर दुसरीकडे ५०० चौ.फू.पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर संपूर्ण माफ व ७०० चौ.फु.पर्यंत सवलत, अशा अनेक"इतिहास जमा" वचनांवर महापालिकेत तुमचे नगरसेवक निवडून आले त्याला आज ४ वर्षं पूर्ण!

"जे बोलतो ते करतो" हे वचन दिलेत,पण ४ वर्षात मुंबईकरांच्या वाट्याला बोलाची कढी आणि बोलाचाच भात!!!! असं ट्विट करत भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी देखील शिवसेनेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.

(bmc bjp corporators protest against shiv sena on property tax assurance)

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोडांनी अखेर सोडलं मौन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा