एफ उत्तर विभागात फेरबदल

  Pali Hill
  एफ उत्तर विभागात फेरबदल
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महानगरपालिका प्रभाग पुर्नरचनेनुसार एफ उत्तर विभागातील अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना या विभागात नव्याने घडी बसवावी लागणार आहे.

  एफ/उत्तर विभागाच्या प्रभाग क्रमांकच्या नगरसेविका 173 अलका डोके यांचा प्रभाग अनुसूचित आरक्षण 'एससी' वॉर्ड साठी जाहीर झाला आहे. तर, वॉर्ड क्रमांक 169 शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांना आरक्षणामुळे नुकसान झालेले नाही.
  ओबीसी महिला आरक्षित प्रभागांमध्ये एफ/उत्तर च्या शाखा क्रमांक 174 च्या 'नयना शेठ' या महिला नगरसेविका असल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ झाला.  तर शाखा क्रमांक १७१ च्या ' महंत रामनरेश चौबे' यांनाही आरक्षणामुळे फारसा फरक पडत नसल्याचे दिसत आहे. ते आपल्या पत्नीला येत्या निवडणुकीत उभे करण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.